✒️प्रशांत जगताप, संपादक
हिंगणघाट, दि.21नोव्हें:- भारतीय संविधान जनजागरण प्रचार मोहिमेअंतर्गत ज्ञान संवर्धन अध्यापक विद्यालय मध्ये भारतीय संविधान जनजागृती मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनंत भवरे (संविधान विश्लेषक, औरंगाबाद) प्रमुख अतिथी दादासाहेब कांबळे (संस्थापक, अध्यक्ष जीवन मुक्ती सोशल फाउंडेशन पुणे), प्रमुख उपस्थिती म्हणून आसाराम गायकवाड (औरंगाबाद), सुरज वाळके (पुणे), अरुण शिंदे (औरंगाबाद) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञान संवर्धन अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य अस्मिता दारुंडे उपस्थित होत्या.
भारतीय संविधान जनजागृती मार्गदर्शनपर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच कार्यक्रमाला लाभलेले मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक द्वितीय वर्षाच्या छात्रध्यापिका कु.प्रियंका त्रिवेदी यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक अनंत भवरे सरांनी लोकशाही मूल्याचा स्वीकार करून संविधान मोहिमे अंतर्गत जनजागृती करणे, तसेच स्वातंत्र्य समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्ष याविषयी मार्गदर्शन केले. तसेच दादासाहेब कांबळे यांनी संविधान हे घराघरांमध्ये पोहोचले पाहिजे भारतीय संविधान जनजागरण प्रचार मोहिमे अंतर्गत संविधानाची जनजागृती होणे आजच्या काळाची गरज आहे. यावर प्रकाश टाकला. तसेच अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या अस्मिता दारुंडे यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे संविधान होय. आजच्या भावी शिक्षकांनी संविधानातील कलमांचा अभ्यास करून ते भावी पिढीमध्ये संविधानातील अधिकार व हक्क, त्याची मूल्ये रुजवावी असे अध्यक्षीय भाषणातून आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रतिभा ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अस्मिता पारेकर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रथमवर्ष व द्वितीय वर्षाच्या छात्रअध्यापक व अध्यापिका तसेच प्राध्यापक वृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348