मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- नाशिक येथील कारागृहातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कारागृहात कैद्याने कारागृहातील कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याने ते जखमी झाले आहे. कारागृहातील यादी कायद्यांनी कर्मचाऱ्यांवर अनेक वेळा हल्ले केल्याचे नोंद सरकार दप्तरी आहे. नाशिक येथील कारागृहातील बॅरेक क्रमांक सहामध्ये येथील कर्मचारी बाबासाहेब शेजुळे हे कर्तव्य बजावत असताना ही घटना घडली.
नाशिक कारागृह कर्तव्य बजावत असलेल्या बाबासाहेब शेजुळे या कर्मचाऱ्यावर गंभीर गुन्हे दाखल असणारा कैदीने डोक्यावर तीन ते चार किलोची फरशी उचलून मारण्यासाठी उगारली. त्याचवेळी इतरांचे लक्ष गेल्याने अनेकांनी त्याला रोखले. ही फरशी कर्मचारी बाबासाहेब शेजुळे यांच्या खांद्याला लागली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यासंदर्भात पुढील कायदेशीर कारवाई कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.
कर्मचारी संख्या कमी असल्याने सध्या कैदी सांभाळणे मोठी कसरत कारागृहातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना करावी लागत आहे. या संदर्भात पुढील कारवाई नाशिक रोड पोलिस करीत आहे. अनेक वेळा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले झालेले आहेत. त्यामुळे कारागृहातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा चिंतेचा मुद्दा होत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348