आज देसाईगंज येथे सायकल भ्रमण करीत अमनदीप सिंह खालसा जवळपास २६ राज्य पार करत देसाईगंज मधे दाखल
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
देसाईगंज:- येथे सायकल भ्रमण करीत अमनदीप सिंह खालसा जवळपास २६ राज्य पार करत देसाईगंज मधे दाखल आज झाले. आज जवळपास १४ वर्ष झालेली आहेत. तरी सुद्धा त्यांची सायकल यात्रा अखंडित सुरू आहे. सामाजिक जीवनात व्यक्तीचे आयुष्य व्यसनाने उध्वस्त होऊ शकते तसेच समाजात नशा मुक्ती झाली पाहिजे या अनुषंगाने त्यांनी कार्य हाती घेतले आहे. अमनदीप सिंह खालसा यांच्या मामाला नशेचे व्यसन होते या व्यसनामुळे त्यांचे आयुष्य समाप्त झाले याचा फार मोठा धक्का अमनदीप सिंह खालसा यांना बसला व तेव्हापासून त्यांनी इतरांच्या कुटुंबात असा हादसा होऊ नये यासाठी आपली नशा मुक्ती बाबत सायकल सायकल यात्रा सुरू केली.
अमनदीप सिंह खालसा हे पेशाने शिक्षक आहे. या त्यांच्या सायकल यात्रेमुळे स्वतः आपल्या मुलीच्या लग्न कार्यात सुद्धा उपस्थित राहू शकले नाही. यावर परिवार त्यांच्यावर नाराज होता तरी सुद्धा त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य खंडित केले नाही आज देसाईगंज नगरीत त्यांची सायकल यात्रा आली असता श्री नंदू भाऊ चावला शिवसेना नेते, मनोज ढोरे प्रदेश सचिव पोलीस दक्षता पीपल असोसिएशन महाराष्ट्र राज्य, जावेद भाऊ कुरेशी समाजकार्यकर्ता, घनश्याम कोकोडे, सोनू चावला, आदी मित्र परिवार यांनी देसाईगंज येथे भेट पुष्गुच्छ देऊन आदर सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे अमन दीप सिंह खालसा आतापर्यंत जवडचे सात लक्ष रुपये खर्च करून कोणाकडूनही एक रुपयाची अपेक्षा करत नाही ही मोठी त्यांची जमेची बाजू देसाईगंज शहर येते सायकल यात्रेचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348