Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

जुन्नर येथे प्रथम लेणी निवासी श्रामणेर शिबिर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 22, 2022
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जुन्नर येथे प्रथम लेणी निवासी श्रामणेर शिबिर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️जुन्नर तालुका प्रतिनिधी

जुन्नर:- दिनांक 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबरला जुन्नर परीसरातील विविध लेणी समुहात श्रामणेर प्रशिक्षण व शिबिर उत्साहापूर्ण वातावरणात संपन्न झाले. 5 दिवस चाललेल्या या शिबिरात एकूण 40 श्रामणेर व‌ श्रामणेरी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी 5 दिवस सेवा देण्याकरीता जुन्नर विभागातील स्थानिक स्वयंसेवक व महाराष्ट्रातील विविध विभागातुन उपासक व उपासीकायांनी निःशुल्क व‌ निस्वार्थपणे धम्मसेवा देण्याकरीता उपस्थित होते.

तस्मातिह भिक्खवे एवरूपं कम्मं करिस्साम यदिदं धम्मेन समग्गं ति एवं हि वो भिक्खवे सिक्खितब्ब ति

“यासाठी भिकखुनो! आपण सर्व नागरिकांनी असे कर्म केले पाहिजे जे धम्मपूर्वक केल्या गेल्याने समग्रता व एकतेकडे जाणारे हो’ असे तुम्ही सर्व लोकांना शिकायला पाहिजे. तथागत गौतम बुद्धानी दिलेल्या या शिकवणीच्या आधारे महाराष्ट्रातील समस्त लेणी संवर्धक संघटनांनी एकत्र येऊन सदर शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात हजारो नागरिकानी उपस्थिती लावली होती.

बुद्ध लेण्यांची निर्मिती भिक्खू संघ, उपासक, व्यापारी यांच्या माध्यमातून झाली असुन लेण्या ह्या मुख्यतः बौद्ध भिक्खू संघाकरीता बनवुन व दान दिल्या‌ आहेत (शिलालेखीय पुराव्यानुसार भारत सरकार कडे यांच्या नोंदी आहेत) वर्षावासातील निवासासोबतच प्रशिक्षण केंद्र आणि बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार सोबतच बुद्ध लेण्यांचा वापर व्यापारी थांब्या‌ करीता केला जात होता. आज बुद्धलेण्यांचे अस्तित्व दुर्लक्षित झाले आहे. म्हणून प्राचीनकाळी ज्या प्रमाणे भिक्खू संघाचा वावर ह्या लेण्यांमध्ये होता त्याच प्रकारे पुन्हा नव्याने व्हावा ह्या सम्यक संकल्पनेतून सदर श्रामणेर शिबिराचे नियोजन संपन्न झाले.

ह्या प्रशिक्षणात श्रामणेर भिक्खुंना प्रत्यक्ष लेणींवर जाऊन प्राचीन काळाप्रमाणे लेणी वास्तव्य करता आले, धम्मलिपि, शिल्पपट, शिलालेख, लेणी स्थापत्याचा अभ्यास करता आला. भिक्खू नागघोष महाथेरो यांच्या हस्ते पब्बज्जा (श्रामणेर दिक्षा) देण्यात आली तर भंते महामोग्गलायण आचार्यांच्या प्रमुख मार्गदर्शनात ५ दिवस श्रामणेर प्रशिक्षण दिल्या गेले. यात भिक्खू काश्यप थेरो, भिक्खु धम्मानंद, #भंते धम्मपाल, भिक्खु वप्प, भिक्खुनी आर्याजी उत्पलवर्णा व ईतर प्रमुख भिक्खू संघाच्या प्रत्यक्ष उपस्थित राहुन प्रशिक्षण दिले.

1500 वर्षांपूर्वी लेणींवर कसे भिक्खु संघाचे वास्तव होते त्याची अनुभूती ह्यावेळी दिनांक 1 ते 5 या दिवसात श्रामणेर भिक्खु व भिक्खुनीनी जुन्नर विभागातील विविध लेणीवर प्रशिक्षणातुन घेतली. 6 व्या दिवशी महासंघदानाची सुरुवात चारीका यात्रा (प्रभात फेरी) ने करण्यात आली यात विशेष मुंबईतील उच्चशिक्षित तरुणींने पारंपारीक वस्त्र परीधान करून भिक्खू संघाच्या चरणी पुष्प अर्पण करीत यात्रेत सहभाग घेतला.

उपस्थित भिक्खु संघास मानमुकुड (गिधविहार) बौद्ध लेणी येथे अट्ठपरीष्कार जीवनावश्यक वस्तू व ईतर दान देण्यात आले. त्रिसरण पंचशीलचा सूर संपूर्ण लेणी समूहावर दुमदुमला लेणी वरील वातावरण मंगलमय झाले व ह्या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भिक्खु संघ भिक्खूनी संघ तसेच उपासक, उपासीका संघ मोठ्या संख्येने मानमुकुड गिधविहार बुद्ध लेणींवर उपस्थित होते. ह्यावेळी आलेल्या उपसकांना भारतीय परंपरेतील पंगत पद्धतीने भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. सदर सोहळ्याचा मुळ उद्देश सफल करण्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहयोग करणाऱ्या सर्व दानदात्यांचे यावेळी आयोजकांनी आभार मानले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडुन दुचाकी चोरटा अटकेत

Next Post

पुणे येथे रात्री 1 वाजता पोलिसांचा दारू पिऊन धिंगाणा! अजुन दारू पाहिजे म्हणून हॉटेल कर्मचाऱ्याला धमकावल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे येथे रात्री 1 वाजता पोलिसांचा दारू पिऊन धिंगाणा! अजुन दारू पाहिजे म्हणून हॉटेल कर्मचाऱ्याला धमकावल.

पुणे येथे रात्री 1 वाजता पोलिसांचा दारू पिऊन धिंगाणा! अजुन दारू पाहिजे म्हणून हॉटेल कर्मचाऱ्याला धमकावल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In