Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चाकण मध्ये महिलेची गळा चिरुन निर्घृण हत्या ! ‘या’ पोलिसांनी २४ तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या !

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चाकण मध्ये महिलेची गळा चिरुन निर्घृण हत्या ! ‘या’ पोलिसांनी २४ तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या !
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

चाकण पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड

पुणे : जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात असलेल्या चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या म्हाळुंगे चौकीच्या हद्दीतल्या खराबवाडी गावाच्या हद्दीत वाण्याचा मळा येथे अज्ञात इसमानं एका अनोळखी महिलेचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा चेहरा दगडानं ठेचून विद्रूप केला.

विनायक रेवजी खराबी यांच्या शेतजमिनीतल्या ओढ्याजवळ या महिलेचा मृतदेह आढळून आला. दि. २० नोव्हेंबर रोजी ही निर्घृण हत्या उघडकीला आली. निकिता संभाजी कांबळे (वय २८, रा. खराबवाडी, ता. खेड, जिल्हा पुणे, मूळ रा. कवठा ता. उमरगा, जिल्हा – उस्मानाबाद ) असं या महिलेचं नाव आहे.

विशेष म्हणजे या हत्येत सहभागी असलेल्या संशयित आरोपीच्या चाकण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या. राम कुंडलिक सूर्यवंशी (वय ३९ रा. पवार वस्ती, साईबाबा मंदीर, दापोडी, पुणे) असं संशयित आरोपीचं नाव आहे.

आरोपी राम सूर्यवंशी आणि मयत महिला निकिता कांबळे ही दोघं पिंपरी चिंचवडच्या एका माॅलमध्ये कामाला होते. तिथं या दोघांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दरम्यान, मयत महिलेचं दुसर्‍या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा आरोपी राम सूर्यवंशीला संशय आला.

दरम्यान, आरोपी राम सूर्यवंशीचं लग्न झालेलं असून त्याच्या घरच्यांना याविषयी समजल्यानं पत्नीसह घरातलं कोणीही आरोपी राम सूर्यवंशीसोबत बोलत नव्हतं. मयत निकिता कांबळे हीदेखील त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. त्यामुळे रागाच्या भरात त्यानं तिचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा चेहरा विद्रूप केला.

पोलिसांनी याविषयी चौकशी केली असता आरोपी राम सूर्यवंशीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. ‘मयत महिला ही माझी मैत्रीण होती, तिचा कोणी खून केला’, असं विचारत आरोपी राम सूर्यवंशीनं जोरजोरात रडत तपासी पोलीस पथकाची दिशाभूल करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

पोलिसांनी व्यवस्थितपणे चौकशी केल्यानंतर आरोपी राम सूर्यवंशीने गुन्ह्याची कबूली दिली. पुण्याच्या सिम्बाॅयसिस महाविद्यालयाच्या आवारात पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीनं पकडलं.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डाॅ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, सागर जैनक,अंकुश लांडे, राजकुमार हनुमंते, योगेश कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सूर्यवंशी, राजेंद्र शेटे आदींच्या पथकानं ही कारवाई केली.

Previous Post

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे किंमत रुपये ८१,४९०/- रु किमतीचा एकुण ०६ किलो ७९० ग्रॅम अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ पकडला

Next Post

नागपूर: पोटात असतानाच झाला बाळाचा सौदा, मुलगी झाल्यास 3 लाख आणि मुलगा झाल्यास 5 लाख रुपये, असे फुटते बिंग.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नागपूर: पोटात असतानाच झाला बाळाचा सौदा, मुलगी झाल्यास 3 लाख आणि मुलगा झाल्यास 5 लाख रुपये, असे फुटते बिंग.

नागपूर: पोटात असतानाच झाला बाळाचा सौदा, मुलगी झाल्यास 3 लाख आणि मुलगा झाल्यास 5 लाख रुपये, असे फुटते बिंग.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In