✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- सध्या नागपूर शहरात छोट्या बाळाच्या चोरी, तस्करी, विक्रीच्या घटनेने खळबळ माजली आहे. त्यात आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे नागपूर येथे चाईल्ड मुल चोरी, तस्करी, विक्री वर नागपूर पोलिसांनी शिकंजा कसायला सुरुवात केली आहे.
नागपूर शहरातील शांतीनगर येथे राहणारे आसिफ आणि अनामिका (काल्पनिक नाव) यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. अनामिकाचे वडील सरकारी नोकरीत होते. तर अनामिका उच्चशिक्षित तरुणी तिचा प्रियकर हा नळ दुरुस्तीचे काम करणारा. तरीही अनामिकाने आसिफ बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
परंतु, आसिफ आणि अनामिका यांच्या प्रेमविवाहास दोन्ही परिवाराचा विरोध होता. त्यामुळे या प्रेमी युगुलांचा हिरमोड झाला. मात्र, अनामिका आणि आसिफच्या भेटीगाठी सुरू होत्या. त्यातून अनामिका गर्भवती झाली. आपली मुलगी गर्भवती असल्याचे कळताच तिच्या आईने तिला घरातून बाहेर काढले. तर आसिफच्या परिवाराने अनामिकला घरात घेण्यास विरोध दर्शवला. तरीही दोघांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. सात महिन्यांची गर्भवती असताना तिची भेट पिंकी ऊर्फ सुजाता लेंडे रा. चिखली, कळमना हिच्याशी झाली. तिने बाळाला जन्म दिल्यानंतर विक्री करण्याचा सल्ला दिला. आसिफ आणि अनामिकाने या बाळाची विक्री करण्यात होकार दिला.
दिवसा मागून दिवस लोटत होते त्यात ऑक्टोबर मध्ये अनामिका प्रसूत होणार होती. त्यापूर्वीच राजश्री सेन आणि पिंकी लेंडे यांनी तेलंगणा येथील राहणारे पाटील दाम्पत्याशी पोटातील बाळाचा सौदा केला. मुलगी झाल्यास 3 लाख आणि मुलगा झाल्यास 5 लाख रुपये असे या करारात ठरले. अग्रिम म्हणून राजश्री सेनने 31 हजार खात्यात टाकण्यास सांगितले. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रियाने मुलीला जन्म दिला. राजश्रीने तेलंगणातील पाटील दाम्पत्याला बाळाचे छायाचित्र पाठवले. त्यानुसार उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी राजश्रीचा आटापिटा सुरू होता.
कसे फुटले बाळाच्या विक्रीचे बिंग.
राजश्री सेन ही एका मोठ्या राजकीय पक्षाची नेता असून नेहमी त्या मोठ्या नेत्यांबरोबर फोटो मध्ये दिसत असतात. राजश्री आणि पिंकी यांनी बाळाला तेलंगणाच्या दाम्पत्याला स्वाधीन करण्याची तयारी सुरू असतानाच राजश्रीवर बाळविक्रीचा गुन्हा दाखल झाला. ‘एएचटीयू’च्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांनी केलेल्या चौकशीत राजश्रीचे पाप उघडकीस आले. शांतीनगरचे ठाणेदार यांनी पिंकीला ताब्यात घेतले आणि हवालदार सुनील वाकडे यांच्या फिर्यादीवरून दुसरा गुन्हा दाखल केला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

