सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर,दि.२२:- काल रात्रीच्या सुमारास चंद्रपूर शहरातील बापुपेठ बायपास जवळील परिसरात मोटर सायकल स्वाराचा अपघात झाला. या अपघातात मोटर सायकल स्वार गंभीररित्या जखमी झाला होत. या अपघाताची माहिती मिळताच टायगर ग्रुप चंद्रपूर हे अपघातात जखमी झालेल्या इसमाच्या मदतीसाठी धाऊन गेले.
काल दोन व्यक्ती मोटर सायकलने बाबुपेठ बायपास परिसरातील मार्गावरून जात होते त्यावेळी त्यांच्या मोटर सायकलचा अपघात झाला.या अपघाताची माहिती टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हा प्रमुख पै.सुर्या भाऊ अडबाले याना माहीत होतात हे आपल्या संपूर्ण ग्रुप बरोबर अपघात ग्रस्ताच्या मदतीसाठी धावुन गेले. यावेळी ते चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालाय जाऊन अपघातग्रस्त रुग्णाची भेट घेतली.
एका अपघातग्रस्त रुग्णाच्या ब्रेन मध्ये मार असल्यामुळे परिस्थिती खुप नाजुक होती रिपोर्ट आल्यानंतर कळल की, ब्रेन मध्ये हलक मार असल्यामुळे रक्त गोठलय. परिस्थिती गंभीर असल्याची माहिती होताच त्यांनी डाँक्टराशी चर्चा करुन तसेच परिवाराशी चर्चा करून पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. तर दुसऱ्या रुग्णाचीची प्रकुर्ती ठिक आहे. टायगर ग्रुप चंद्रपूर मित्र परिवार त्यांच्या सोबत आहेत कोणतेही मदत लागल्यास आम्ही करू असे परिवारशी बोलताना सुर्या भाऊ अडबाले यांनी आपले विचार व्यक्त केल.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
.

