राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- आज दि.25 नोव्हेंबर रोज शुक्रवारला दुपारला धाबा येथील सुनील कोंडुरंवार यांच्या धानाच्या ढिगाला आग लागली यात धानाचा सम्पूर्ण ढीग जळून राख झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. गावकर्यांच्या मदतीने पाणी टाकून आग विजविणे सुरू आहे.
यंदा तब्बल पाच वेळा पुर आला.नदी नाले तुडूंब भरले खरीप हंगामात लागवड केलेले धान, सोयाबिन कापूस यासह अन्य शेतपीक पूराच्या पाण्यात बुडाल.तालुक्यातिल शेतकऱ्यावर दुबार तीबार पेरणीची वेळ आली. शेतकर्यांनी नव्याने पिकांची लागवड केली. नव्याने लागवड केलेलं पीक जगल. जंगली जनावरे पिकावर तुटुन पडली. रानडुकराने पिकाची नासाडी केली.तर धानावर आलेल्या करप्या, तुडतुडा रोगाने शेतकऱ्यांची झोप उडवली. वारंवार किड व कीटकनाशक औषधाची फवारणी करून पीक चांगले आले.
नूकतेच धान पीक परिपक्व झाल्याने धान कापनीची व बांधण्याची तालुक्यात लगबग सुरू झाली. मजूर लावून धान कापण्यात आले.शेतात धानाचे ढिगारे दिसून येत आहे.
अश्यातच धाबा येथील सुनील कोंडुरवार यांच्या धानाचा ढिगाला अचानक आग लागली.घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली.आग विजवि ण्यासाठी अग्नी शामक यंत्रनेला बोलविन्यात आले. आग विजविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. आगीत धाबा येथील सुनील कोंडुरवार यांचे धानाचा ढिगारा जळला. आगीत धान जळून राख झाल्याने लाखाचे नुकसान झाले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

