दशरथ गायकवाड हावेली प्रतिनीधी
पिंपरी चिंचवड :- आज शनिवार दिनांक २६/११/२०२२ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री विठ्ठलराव गवळी, संस्थेचे खजिनदार श्री बाळासाहेब सावंत, सेक्रेटरी श्री निळकंठ लांडगे व श्री. राहुल खांडेकर (संयोजक ,बहुजन संघटक , यूट्यूब फेसबुक चॅनल) तसेच ज्ञान प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राहुल गवळी व ज्ञान प्रभात विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ प्रज्ञा सोनवणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्यासंख्येने पालक वर्ग यावेळी उपस्थित होते सर्व प्रथम सविंधान दिंडीचे पूजन व प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यानी सकाळी सविंधान दिंडी काढली यामध्ये बालवर्ग १ ली ते १० वी चे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी दिंडीतील विद्यार्थ्याच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला त्यानंतर सामूहिक संविधान वाचन करण्यात आले तसेच या प्रसंगी विद्यार्थी भाषणे तसेच नृत्य सादर करण्यात आले तसेच काही विद्यार्थ्यानी कविता व गीत देखील सादर करण्यात आले त्यांनतर चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री विठ्ठलराव गवळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .बाळासाहेब सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे प्रास्ताविक सादर केले व माध्यमिक मुख्याध्यापक श्री. राहुल गवळी यांनी सर्वांचे आभार मानले . त्यानंतर विद्यार्थ्याना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

