कवी:: सुनील ब गायकवाड राह. पुणे
मोबा. 9850629711
तू म्हणतोस ना ?
संविधान तुझं आहे,
बरं ठीक आहे, माझं तर माझं,
पण, माझ्या संविधानात,
तूला ही मान आहे.
पण, तूझ्या धर्मग्रंथात ,
मला कुठे स्थान आहे ??
मंदिर तुझं, देव तूझा,
आणि पुजारी ही तूझाच,
माझं फक्त पेटीत दान आहे.
तूझ्या त्या ग्रंथात,
महाराच्या घरात महार,
मांगाच्या घरात पोतराज मांग,
चांभाराच्या घरात चांभार,
भंग्याच्या घरात भंगी,
कुंभाराच्या घरात कुंभार,
न्हाव्याच्या घरात न्हावीच ,
जन्म घ्यायचा.
बरं का मित्रा, आता
माझ्या संविधानात,
महार, मांग, चांभार, कुंभार, भंगी, तेली, तांबोळी, साळी, माळी, कोळी, लोहार, सुतार, धनगर, वंजारी, बंजारी,
भटके-विमुक्त, आदिवासी, कातकरी ,
अठरा पगड शुद्रातिशुद्रा ,
जातीच्या घरात.
डाॅक्टर, इंजीनियर, मास्तर,
लेखापाल, रोखपाल ,
आयपीएस ,आयएएस,
वकील, न्यायाधीश,
मॅनेजर , उद्योजक, शास्त्रज्ञ ,
आमदार, खासदार, मंत्री,
जन्म घेतात मित्रा.
हेच तर संविधानाचं योगदान.
पण,
तूझ्या त्या ग्रंथात,
कुत्र्याला भाकर, आणि मुंगीला साखर,
सापाला दूध, आणि माणसाला मूत.
कुठे आहे रे, माणसाची जाण?
तूझी ती, निच-संकुचित मानसिकता.
कधीच बदलत का नाहीस रे,
आणि मग, गटारातून बाहेर यावी घाण.
तसा तूझ्या मनातल्या, जळफळाटाचा उद्रेक होतो.
आणि तू, संविधान बदलण्याची भाषा बोलतो.
संविधान बदलण्याची भाषा बोलतो..
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348