✒️रूपसेन उमराणी मुंबई ब्यूरो चीफ
मुंबई:- ‘नफरत छोडो संविधान बचाओ’ या अभियानाद्वारे देशातील अनेक प्रगतिशील संस्था संघटना आणि राजकीय नेते कार्यकर्ते एकत्र येत ‘भारत जोडो’च्या आधीपासून त्यांनी मोहीम सुरू केलेली आहे. आणि भारत जोडो मोहीम याला देखील या नफरत छोडो संविधान बचाव अभियानाने समर्थन दिले. सक्रिय पाठिंबा दिला आणि जन आंदोलनाच्या राष्ट्रीय संघटनेच्या नेत्या मेधा पाटकर देखील राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेमध्ये सहभागी झाल्या होता.
ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर या महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना त्यांनी सुरू केलेल्या ‘नफरत छोडो संविधान बचाओ’ या अभियान यावर माहिती दिली.
आज मूठ भर लोकांच्या हाती सत्ता आणि पैसा आहे. अडाणी आणि अंबानी यांच्या त्यांनी प्रहार केला आहे.
भारत जोडो मध्ये सहभाग..
राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत मेघा पाटकर या सहभागी झाल्या होत्या त्यावर बोलताना म्हणाल्या आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही पण देशाला योग्य दिशा देण्याचे काम कुणी करत असेल तर आम्ही त्यांना सपोर्ट करू. आज जाती धर्माचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे भारतीय संविधानाची पयामल्ली होत आहे.
मेधा पाटकर म्हणाल्या की, ”आमचा संविधानावर विश्वास आहे. तसेच देशामध्ये जात, संप्रदाय व धर्म यांच्या आधारावर माणसांमध्ये भेदभाव करण्याला विरोध आहे. मात्र संविधानाचा विचार घेऊन पदयात्रेमध्ये सामील होण्याबाबत अनेक राजकीय नेते घाबरले की काय असे आम्हाला वाटत आहे. ज्या संविधानाच्या समता, न्याय आणि लोकशाही मुलांच्या आधारेच 50 हजार पेक्षा अधिक विस्थापितांची लढाई आम्ही अहिंसेने शांतीने लढलो. त्यानंतर आम्हाला त्याबाबतीत काही एक न्याय मिळाला. आमच्यासारख्यांना विकास विरोधी ठरवणे म्हणजे हे विकृत पद्धतीचे विश्लेषण त्यांनी केले असल्याचा टीका मेधा पाटकर यांनी केलेली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

