मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मोबाईल नंबर 9420751809
अहेरी:- तालुक्यातील आलापल्ली येते संगमित्रा बुद्ध विहारात जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अहेरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आलापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले. प्रथम महाकारुणिक विश्वंवदनिय तथागत भगवान बुद्ध तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना मेनबती, अगरबत्ती लावून वंदना ग्रहण करण्यात आली. नंतर बालकाना आणापान सतीचे मार्गदर्शन आयु. भीमराव झाडे, यांनी दिले. नंतर आयु. बी. एम. दूर्गम सर, यांनी बालकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला आयु, भीमराव झाडे, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण ,तालुकाध्यक्ष आयु,बी.एम.दूर्गम सर, आयु, मोहुरले साहेब, आयु,राजेश्वर दुर्गे. वामन भगत उपाध्यक्ष संस्कार विभाग तालुका शाखा अहेरी. बालक, पालक आणि बौध्द अनुयानी मोठया संख्येने उपस्थित होते.

