✒️वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
पुणे:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने लिहिलेली ‘भारतिय राज्यघटना ‘२६ नोव्हेंबर १९४७ रोजी देशाला अर्पण केली, तेव्हा पासून हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. अशाच या संविधान दिनाचे औचित्य साधून कलवड येथिल सिध्दार्थ बौद्ध विहार व सावित्री महिला मंडळाच्या विद्यमाने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संविधान दिनाच्या निमित्ताने शहरातून संविधान रॕलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हर घर संविधान या अंतर्गत प्रत्येक घरात जाऊन संविधान प्रतिचे वाटत करण्यात आले. या रॅली मध्ये लहान मुलांनी विविध पेहराव करून मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते लहान मुले व महिलांसाठी हस्ताक्षर स्पर्धा व संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे भाषण झाले व महिला मंडळाच्या वतीने मुलांना पेण व खाऊ वाटप करण्यात आले.
देशातील सर्वसामान्यांच्या उज्जल भवितव्याकडे बघणारी दुरदूष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्यापाशी होती. म्हणूनच स्वतंत्र भारताची राज्य घटना लिहीताना भारताचा प्रदिर्घ इतिहास, चाली रिती, धर्म, पंथ, सर्वमान्य भावना व लहान थोरांसह सर्व घटकांचा विचार करून घटनेला जे रुप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले त्यामुळे आजही भारत एकाच सुत्रात बांधलेला आहे.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटल की, आज जगात ठिकठिकाणी अनेक विनाशकारी स्थित्यंतरे झालीत, मोठमोठी साम्राज्ये अगदी पत्याच्या खेळा सारखी कोलमडलित, अनेक राष्ट्राची हिंसेच्या व्यवहारातुन अनेक शकले झालीत पण आपल्या भारताचा संविधानाची चौकट भविष्याचा वेध घेऊन सामाजिक बांधीलकी जोपासणारी आणी बुध्दीमत्तेच्या पायावर सुरक्षित उभी आहे. आता तर जगातील अनेक देशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले आपल्या भारत देशाची राज्य घटना दिपस्तंभाचे, नविन प्रकाश निर्माण करण्याचे काम करीत आहे. आपले संविधान म्हणजे लाखो करोडो सर्वसामान्य भारतीयांच्या मनाची स्पंदनं आहे. श्वास आहे. आपल्या देशात निर्भयपणे जगण्याचा विश्वास आहे. भारत देशाची आपली घटना डॉ. बाबासाहेब तुम्ही तम्माम भारतल्या जनतेला दिलीली बहूमोल देणगी समजुन. ती नेहमी अबाधीत राहील आणी अबाधीत ठेवण्याची ही आजच्या व उधाच्या पिढीची जबाबदारी असुन त्याचे स्मरण ठेवणे हाच आपल्याला आमच्या सर्व देशवासिया आदर असणार.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

