माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
हिंगणघाट,३० नोव्हें:- संविधान दिना निमित्त संविधान रॅलीचे आयोजन केले असता माजी आमदार प्रा.राजू तिमांडे पायी चालत रॅलीमध्ये सहभागी होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानाचे सामूहिक वाचन केले तसेच संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक हिंगणघाट येथे मोठ्या संख्येने समाज बांधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आजच्या दिवशी भारतीय लोकांनी भारताचे संविधान स्वीकारुन स्वतःप्रत लागू केले. आपण सर्व या सार्वभौम देशाचे नागरिक म्हणून अभिमानाने वावरू लागलो.
प्रत्येकाने ही घटना स्वीकारली आहे. त्याचा सर्वांना अभिमान आहे. ज्या घटनेचा आपण अभिमान बाळगतो त्या राज्यघटनेचे जतन, संरक्षण आणि बळकटीकरण करण्यासाठी आपले योगदान काय? घटनेच्या संरक्षणासाठी आम्ही काय केले अथवा काय करतो आहोत? या देशाची राज्यघटना लोकशाहीचा पाया आहे. या देशाची संस्कृती, परंपरा, वारसा, मूल्य, विचार जपण्याचे आणि आयुष्याचे तत्वज्ञान सांगण्याचे कार्य राज्यघटनेने केले आणि करत आहे.
असे म्हणतात की फक्त उद्देश उद्दात व चांगला असणे पुरेसे नाहीं, तर त्यास चांगल्या कृतीची जोड़ असेल तरच उद्देश परिपूर्ण होऊ शकतो.आपल्या कृतीतून राज्य घटनेची अंमलबजावणी करणे, तिचे मजबुतीकरण करणे आणि संविधान निर्मात्याचा उदात्त हेतू साकारण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे हेच राज्यघटनेच्या बळकटीकरणा साठी आवश्यक आहे.त्यासठी आपण सर्वानी आपल्या कृतीतून संविधानाचे बलकटीकरण करण्याची भूमिका साकारणे गरजेचे ठरते. वास्तविक पाहता तशी संस्कृतीच असणे अपेक्षित आहे. संविधान दिवसा निमित्त संविधान संरक्षणासाठी आणि राज्यघटनेच्या बळकटीकरणासाठी संकल्प करूया. असे मत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी व्यक्त केले.