मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
सिरोंचा:- तालुक्यातील अतिदुर्गम भागातील झिंगानूर या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक मंडळाची निवडणूक नुकताच पार पडली असून यात 13 पैकी 9 संचालक आदिवासी विद्यार्थी संघटनेचे असून यामध्ये रामाजी आत्राम अध्यक्ष व बाबुराव कुम्मरी उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर सहकार नेते व जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली होती. या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालक मंडळामध्ये आत्राम रामा लक्का, कुळमेथे चिंतामन रामा, मडावी चिंतामन डोबा, मडे कारे सिरिया, मडे मल्ला बक्का, मडे लच्चा पेंटा, बाबुराव बानय्या दुर्गम, मधुकर भीमराव कोंडागोरला, लांबाडी लसमय्या रामुलू, आदींचा समावेश आहे.
झिंगानूर येथील नऊ संचालक मंडळांना निवडून आणण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव, आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम, आविस आविस शहर अध्यक्ष रवी सुलतान, अविसचे उपसरपंच शेखर गणारापू, दुर्गेश लांबाडी, सुरेश कुमारी, श्रीनिवास कुमारी, रामा आत्राम चिंतामण मडावी, चितामण कुळमेथे, भीमराव कुडमेथे, रमण्णा कोंडागोरला, प्रभाकर कुमारी, मडावी, कारे सिरिया मडावी, लचा रामा मडावी, राकेश गावडे, रमेश गावडे, मडावी, राहुल मडावी, व्यंकटी नैताम शंकर नैताम, धर्मागावडे, गुंडा कारके मडावी, पोरीया सिडाम, रमेश, स्वामी कोडागोरला, तिरुपती,मालय्या कुमारी, रवी वसंत कुमारी, मासा गावडे, मधुकर कोडागोरला, सुभाष, अक्षय कुमारी, बक्का आत्राम, रमेश मडावी,अर्जुन मडावी कैलास मडावी,आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

