मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज!ऑनलाईन नाशिक:- दारु पिण्यास पैसे न दिल्याने व उधारीचे पैसे मागितल्याने संशयित बंडु गटकळ याने चांद गुलाब सैय्यद वय ६३ वर्ष, रा. डीजीपी नगर रोड यांना मारहाण केल्याची घटना घडलीआहे. पंचवटीतील संजय नगर येथे बुधवारी दि.३० सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
चांद सैय्यद हे त्यांच्या मित्राकडे जात असताना संशयित बंडूने त्यांच्याकडे दारुसाठी पैसे मागितले. चांद यांनी पैसे देण्यास नकार देत बंडूला उधार दिलेले पैसे मागितले. त्याचा राग आल्याने बंडूने धारदार शस्त्राने चांद यांना मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात बंडू विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

