✒️वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन पुणे:- प्रसिद्ध लेखक कवी आणि प्रोफेसर डॉ. राजेश गायकवाड पाटील याचं नुसतच “बाप नावाची माय” काॅन्टिनेंटल प्रकाशन पुणे या पुस्तकाला नुकताच “झेप” औरंगाबाद हा 27 वा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्या पुस्तकाचे हिंदी, कन्नड व इंग्रजी भाषांमध्ये भाषांतर ही झाले आहे. लवकरच ते अभ्यासक्रमात समावेश होणार आहे. हे पुस्तक मानवी जीवनासाठी एक दूरदुष्ट्री देणारे पुस्तक असून ते सर्वांनी वाचावे असे आव्हान यावेळी व्यक्त केली.
याअगोदर पण प्रोफेसर डॉ. राजेश गायकवाड पाटील यांनी अनेक पुस्तकं लिहली आहे त्यात कोरोना प्रतिबंध व उपाय या पुस्तकाला ही अखिल भारतीय प्रकाशक महासंघाचा व ईतर 2 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नुकताच प्रकाशित “कविता संग्रह” बिन चेहर्याच्या कविता, काॅन्टिने़टल प्रकाशन पुणे यास ही 3 पुरस्कार मिळाले आहेत.
लेखक कवी प्रोफेसर डॉ. राजेश गायकवाड पाटील यांचे लिखाण हे समाजात धगधगत्या विषयावर असून ते आपल्या पुस्तकात सामाजिक वास्तव्य मांडत असतात. त्यांचे पुस्तकात मानवी जीवन आणि विचार अगदी साध्या आणि सोप्या शब्दात त्याच वर्णन करण्यात आले आहे. दुःखाला सुखात आणि आनंदात परिवर्तित करून आत्मदुष्ट्री प्रधान करत आहे. हे पुस्तक शिक्षण देते की, कसे आपल्या प्रती कृज्ञता आणि दुसऱ्याच्या दुःखाच्या प्रती करुणामय भावनाचा विकास करण्याचा मुल मंत्र देत आहे.
यावेळी महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना लेखक कवी प्रोफेसर डॉ. राजेश गायकवाड पाटील म्हणाले की, आम्ही सदरील पुस्तके आपल्या सर्व वाचक वर्गासाठी उपलब्ध करून देणाऱ्या येणार आहे. आपणास पुस्तके हवी असल्यास आपला पत्ता द्यावा. सध्या २५ टक्के सवलतीत, हि पुस्तके प्रकाशक देत आहेत. थोड्याच दिवसाची हि स्किम आहे. तेंव्हा त्वरा करावा आणि अनमोल विचाराच्या पुस्तकं संग्रह करा. डॉ. राजेश गायकवाड पाटील प्रोफेसर लेखक व कवी, डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर मोबाईल नंबर 8848941635 यांचावर संपर्क साधावा. असे आव्हान यावेळी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

