अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नंबर -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन सावनेर:- गुजरखेडी येथील सावनेर पब्लिक स्कूल सावनेर येथे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सावनेर पब्लिक स्कूलच्या अंडर 14 वयोगटात विद्यार्थिनी तर अंडर 17 वयोगटातील विद्यार्थी यांची जिल्हास्तरीय तायकांडो वतालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण 20 टीमांच्या समावेश होता.

यावेळी स्पर्धा आयोजन कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाकरजी डहाके पाटील संचालक सावनेर पब्लिक स्कूल, प्रमुख पाहुणे लीलाधरजी खंगार, प्राध्यापक योगेश पाटील, चव्हाण सर, योगेश बन, सावनेर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका ममता अग्रवाल व वैशाली देशपांडे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत कोमुजवार, शिक्षिका कोहाड, मंगला जोगी, पायल मॅडम, घोरमारे मॅडम तसेच आसोले मॅडम, क्रीडा संकुल येथील शिक्षक लोहकरे सर, शर्मा सर, अमोल जीवतोडे, प्रफुल नारनवरे, दिनेश सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यावेळी तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत अंडर 14 मध्ये सावनेर पब्लिक स्कूलच्या मुलींनी तर अंडर 17 मध्ये सावनेर पब्लिक स्कूलच्या मुलांनी बाजी मारली. नागपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायकांडो स्पर्धेत नमन खोरगडे यांनी सुवर्णपदक पटकावले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

