कवी लेखक :: गिरीष जाधव, राह. पुणे
पाय उंबऱ्या बाहेरी
पाठी पाटी दफ्तर भरली
पोरं निघाली शाळेंला
पापा आयेचा गोड धोड,
बाप उभ्या घराची सावली.
मोठ्ठाला दादा हात धरी,
लहाना भाऊ लहानी ताई.
इल्लु इल्लु काया त्यांची,
रस्त्यानं गाली हांसते.
एकमेकां काढता चिमटे,
आली शाळा पटांगण मोठे.
काढा पाटी पेन्सिल खडू,
गिरवा अक्षर काजवे.
बाई म्हणे घंटा वाजली,
जेवण सुट्टी झाडा खाली.
डब्बे उघडले मुलांनी,
भाकर चटणी तोंडाले.
कावळे जमले फांदीवर,
मेजवानीसाठी चौफेर.
पटांगण सजले,
मुलांच्या खेळानी.
शाळा सुटता सुटली,
पाटी तोऱ्यात हांंसली.
मुलं आनंदात येता घरी,
हात पाय धुती घरा बाहेरी.
मऊ खिचडी ताटात दिसते,
थोडी वामकुक्षी मग शिकवणी.
दुसऱ्या दिशी पुन्हांदी,
तीच शाळा,
तोच वर्ग,तोच फळा.
रंगीबेरंगी खडूंशी,
जुळलेला छंद आगळा.
कुणी परिस्थितीनं शिकतं,
कुणी मागेच राहती,
कुणी पुढेच चालण्या.
चालण्याचे कष्ट घेती,
चालण्याचे कष्ट घेती,
तेच पुढे मोठे होती.
मोठी होऊन पुढंती,
सारे संविधान सांगती.
संविधान ज्यांनी लिहिले बाळा,
त्यांनी केली सगळ्यांची शाळा.
आज फुलवीलेला मळा,
माह्या बापाचा व्याप सगळा.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

