✒️प्रशांत जगताप, संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन
हिंगणघाट:- शहरातील सिद्धार्थ नगर, दिक्षाभुमी मार्ग वरील “द सिम्बॉल ऑफ नोलेज” डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयला हिंगणघाट येथील संजय गांधी शाळेच्या वर्ग 9 वी व 10 वी चे विद्यार्थी/विद्यार्थीनी यांनी भेट दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात संजय गांधी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
हिंगणघाट शहरातील सिम्बॉल ऑफ नॉलेज या वाचनालयाने अनेक क्षेत्रांत मोठी भरारी घेतली आहे. हे वाचनालय आठवडय़ाचे सातही दिवस साप्ताहिक सुट्टी न घेता नियमितपणे सुरू असते. हे वाचनालय विद्यार्थ्याच्या जीवनाला कलाटणी देण्याचे उत्तम असे मध्यम म्हणून निरंतर आपले कार्य करत आहे. या वाचनालयात अनेक उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह तर आहेच, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आणि अनेक विषयावर आधारित पुस्तकेदेखील वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ही सेवा विनामूल्य पुरविण्यात येते. दरवर्षी नियमितपणे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम आणि स्पर्धाचे आयोजन केले जाते.
या वेळी संजय गांधी विद्यालयाचे सिध्दीकी सर (शिक्षक) व त्यांच्या सहयोगी शिक्षीका यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वाचनालयात दाखल झाले. याप्रसंगी वाचनालयाचे केअर टेकर यांनी संगणक , मोबाईल, इंटरनेट, ई-बुक च्या युगात मुलांच्या शरीरावर होणारे दुषपरिणाम पुस्तक/ग्रंथ वाचनाचे महत्व तसेच वाचनालय चे महत्व, त्याच्या निर्मितीचा उद्देश अश्या अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी वाचनालय संचालक मंडळच्या अध्यक्षा साधनाताई दहीवडे, उपाध्यक्षा मनिषा ताई तावाडे, सचीव विजयाताई झाडे, कोषाध्यक्ष आकाश दुर्गे, सदस्य महिपाल रामटेके, मायाताई रा दुर्गे, संगिता दुर्गे इ. उपस्थीत राहुन वाचनालयच्या वतीने विद्यार्थ्यांचे व सिध्दिकी सर यांचे धन्यवाद व्यक्त केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348