कवी: गणेश रामदास निकम, चाळीसगांव गणेशपूर
पावन चैत्यभूमीवर आज
गर्दीने मिळेल आम्हा वाट
दर्शन घेण्यासाठी भिमाचे
शांत होईल समुद्राची लाट..
निळा निळा तो महासागर
आज करेन भिमाचे चरणस्पर्श
भीम कृतीतून जिवंत राहील
जरी झालीत आज वर्षानुवर्षे..
दर्शन घेणे भावूक होणे
एवढीच नाही चैत्यभूमीची गाथा
चैत्यभूमीवर पाऊल ठेवताच
मिळतात प्रगतीच्या वाटा.
क्षणभर पाहून त्या चैत्यभूमीला
संघर्षाची ठिणगी मनात पेटते
ऊर्जा एक नवी जगण्याची
त्या चैत्यभूमीवरून वाटते..
बोलतो आमच्याशी बाप आमचा
होऊनही देहाची सारी राख
आमच्या चुकांकडे चुकूनही
करतच नाही कधी डोळेझाक..
सांगतो पुस्तकांतून आम्हांला
प्रेरित करणारी संघर्षांची वाणी
आठवून आमच्या भाग्यविधात्याला
डोळ्यात तरळते पाणी..
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

