Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हातील अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करा, बोगस डॉक्टर शोध समितीची बैठक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 6, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वर्धा जिल्हातील अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करा, बोगस डॉक्टर शोध समितीची बैठक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, विशेष प्रतिनिधी
मो. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन वर्धा, दि.6:- जिल्ह्यात काही भागात अनधिकृतपणे बोगस डॉक्टरांकडून वैद्यकीय व्यवसाय केल्या जात असल्याचे दिसून येते. अशा डॉक्टरांमुळे रुग्णांच्या आरोग्यावर वितरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

बोगस डॉक्टर शोध मोहिम जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर, पोलिस निरिक्षक निलेश ब्राम्हणे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सतिश चव्हाण, मुख्याधिकारी राजेश भगत, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्रामचे अधिक्षक डॉ. नितीन गगने, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महाकाळकर आदी उपस्थित होते.

वैद्यकीय व्यवसायीकांना अधिकृत परवाना असल्याशिवाय व्यवसाय करता येत नाही. शिवाय ज्या पॅथीचा परवाना आहे. त्याच पॅथीचा व्यवसाय करणे आवश्यक आहे. असे असतांना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पॅथीचा व्यवसाय केला जात असल्याचे दिसून येते. काही भागात बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत असल्याचे गंभीर प्रकार दिसून आले आहे. अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपुर्वी ग्रामीण भागात केलेल्या सर्वेक्षणादरम्यान अनधिकृतपणे व्यवसाय करीत असल्याचे 48 वैद्यकीय व्यावसायिक आढळून आले होते. यापैकी 10 बोगस डॉक्टारांवर तालुकास्तरीय समिती मार्फत पोलिस विभागास त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत कळविण्यात आले आहे. बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाने स्वतंत्र आदेश काढून बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

जिल्हा, तालुका व नगर पालिका स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समित्यांनी आपआपल्या क्षेत्रातील बोगस डॉक्टरांचा शोध घ्यावा. त्यासाठी पोलिस विभागाची मदत घ्यावी. शहरी भागामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवून कारवाई करावी, असे निर्देश बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. शोध मोहिमेसाठी अद्ययावत नियमावली तयार करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या.
रामनगर येथील डॉक्टरवर कारवाईचे निर्देश
वर्धा शहरातील रामनगर येथे सुर्यवंशी नामक एक व्यक्ती कोणतीही वैद्यकीय पदवी नसतांना अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले होते. या व्यक्तीवर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

कविता: पावन चैत्यभूमी

Next Post

महावितरण’ने पूर्व विदर्भातल्या पाच जिल्ह्यांत शेतकऱ्यांसाठी १२ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयातून वर्धा जिल्ह्याला वगळले आहे. हा भेदभाव का?

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महावितरण’ने पूर्व विदर्भातल्या पाच जिल्ह्यांत शेतकऱ्यांसाठी १२ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयातून वर्धा जिल्ह्याला वगळले आहे. हा भेदभाव का?

महावितरण'ने पूर्व विदर्भातल्या पाच जिल्ह्यांत शेतकऱ्यांसाठी १२ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयातून वर्धा जिल्ह्याला वगळले आहे. हा भेदभाव का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In