संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन राजुरा:- २६ व्या ओकिनावा राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप, दिल्ली येथे 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर 2022 मध्ये पार पडली. या चॅम्पियनशिप मध्ये इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा मधून कुमारी मनस्वी शेंडे, जानवी मोहुर्ले, मानसी कामिल्ला हिने तृतीय स्थान पटकविले, तर मुलांमध्ये साहिल ढुल या विद्यार्थ्यांने तृतीय स्थान पटकवून संपूर्ण तालुक्याचे आणि शाळेचे नाव उज्वल केले.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू मुख्याध्यापक रफिक अन्सारी, त्यांचे प्रशिक्षक श्री प्रविण मंगरूळकर, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, सुभाष पिंपळकर, यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

