✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट,दि.६डिसेंबर:- जी.बी.एम.एम. हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरवादी प्रचारक बापूरावजी जनबंधू यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न, परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली. नंतर राष्ट्रगीत, संविधानाची प्रास्ताविका व प्रतिज्ञा म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून बापूरावजी जनबंधू यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. प्रशालेचे प्राचार्य जी.एम.ढगे यांनी आ़बेडकरवादी विचारांच्या प्रचारासाठी व प्रशालेचे माजी विद्यार्थी म्हणून शाल, छोटीसी भेट व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि शिक्षकांचे त्यांच्या जीवनातील महत्व विषद केले. मा.प्राचार्य यांनी देशाला आंबेडकर यांच्या विचारांची नितांत गरज आहे असे मत व्यक्त केले. उपमुख्याध्यापक श्री फुटाणे यांनी बाबासाहेबांनी लिहिलेले “भारताचे संविधान” हे देशाला दिलेली अमूल्य भेट आहे असे मत व्यक्त केले.
प्रशालेच्या जेष्ठ शिक्षिका म्हैशगवळी यांनी ‘बाबासाहेबांचे ओबीसीसाठी योगदान’ यावर प्रकाश टाकला.जेष्ठ शिक्षिका ढोबळे यांनी बाबासाहेबांनी स्त्रीयांच्या उद्धारासाठी केलेले मोलाचे योगदान यावंर भाष्य केले.ज्यु.कॉलेजचे शिक्षक सचीन सोमकुवंर यांनी प्रमुख अतिथी बापूरावजी जनबंधू यांचा परीचयाच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार प्रसारासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मोलाची माहिती दिली.संगीत शिक्षक खंदारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना अभिवादन म्हणून भावपूर्ण गीत सादर केले.काजी सरांनी बाबासाहेबांवर कविता सादर केली. आनंदराव साखरे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी सूत्र संचालन केले.
यावेळीनिशा सहारे, कबीर विजय, योगेश्वरी डेकाटे, नाजिया शेख, कृतिका परबत, प्रेम मेलेकर, खुषी जवादे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सर्व शिक्षक शिक्षिका आणि इतर कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.बाबासाहेब अमर रहे च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

