वैशाली गायकवाड उपसंपादक पुणे
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुणे शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या, महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे शहरात नागरिकांनी आणि विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याने डॉ. बाबासाहेबाना अभिवादन यांना अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होती
यावेळी पुणे शहरातील विविध सामाजिक संस्थाचे कर्मचारी तिथे उपस्थित होते. सामाजिक प्रश्नांचे भान ठेवून रूग्ण हक्क परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन समाज पार्टी यांच्या माध्यमातून महात्मा फुले स्मृतीदिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यानच्या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘जातीय व्यवस्थेचे निर्मूलन ‘ या पुस्तकाचे मोफत वाटप यावेळी केले गेले.
लोकांत सामाजिक संस्था संविधानाचे मूल्य जपून महिलांवरील होणा-या अत्याचारा विरोधात कार्य करते, तसेच महिलां संदर्भात त्यांच्या विविध प्रश्नांवर काम करतात, या सामाजिक संस्थेमार्फत पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला. अखंड चोवीस तास आंबेडकरी विचारांचा जागर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महामानवाला अभिवादन करण्यासाठी लांबचलांब रांगा असूनही रांगेतच शिस्तबद्ध पद्धतीने कोणी मध्ये न घूसता आपल्या मुक्ती दात्याचे जड अंतःकरणाने दर्शन घेतले, सर्व शिस्तप्रिय आंबेडकरी अनुयायांनां मानाचा जय भीम.

