प्रवीण जगताप, विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक रा.सू. बिडकर महाविद्यालयात इंग्रजी विभागाद्वारे इंग्रजी भाषा व साहित्य मंडळाचे उद्घाटन पार पाडले. या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. राजेश्याम इंग्रजी विभाग प्रमुख, विद्या विकास कॉलेज, समुद्रपूर. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बी.एम. राजूरकर उपप्राचार्य, डॉ. शरद विहीरकर, प्रा.विकास बेले, डॉ. मिलिंद तेलंग, डॉ.राजू निखाडे, प्रा. कृष्णा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून प्रा. विकास बेले यांनी अभ्यास मंडळ स्थापनेचा उदेश सांगीतला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीच्या डॉ. राजेश्याम यांनी विद्यार्थ्यानी आपला शब्दसंग्रह कसा वाढवता येईल यासाठी किमान पाच शब्द रोज पाठांतर करावे असे सांगितले. साहित्य वाचनावर भर द्यावा साहित्यातून खऱ्या अर्थाने जीवनाचे प्रतिबिंब स्पष्ट होते असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजूरकर यांनी कार्यकारणी घोषित केली या कार्यकारणी मध्ये अध्यक्ष लोकेश वैतागे, उपाध्यक्ष नीलम डुकरे, सचिव विपुल फुलमाळी, सहसचिव श्रेया ठाकरे, कोषाध्यक्ष कुमारी सेजल भोयर, सदस्य प्रीती हिवरे, वैष्णवी घोटेकर, रूपाली येटे, राजवी नागपुरे, उदय नगराळे, शिवानी पंडीत यांची घोषणा केली.
विद्यार्थ्याना संबोधित करताना ते म्हणाले की या प्लॅटफॉर्मचा उपयोग विद्यार्थ्यांनी स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी. असे वक्तव्य केले कार्यक्रमाचे संचालन प्रतिक्षा गावंडे हिने केले तर आभार प्रीती हिवरे ने मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.