राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. राजुरा शहराला लागून असलेल्या बामणवाडा गावात आज सकाळच्या सुमारास शुल्लक वादातून एका तरुणाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. महादेव कोडापे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
आज बामणवाडा येथे 9:30 वाजताच्या सुमारास किरकोर वादातून महादेव कोडपे यांना गावातीलच युवकाने सुरीने भोकसुन जखमी केले. त्यांना जिल्हा उपरुग्णालय येथे गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले. घाव गंभीर असल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना त्यांची अर्धवरच प्राणज्योत मालवली.
बामणवाडा येथे वादाच्या घटना नेहमी घडत असून त्याला कारण गावात मिळणारी अवैध दारू, गावात जुगार व दारू बंद करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ह्याच मार्गाने अनेक अवैध धंदे सुरू असल्याने गावात पोलिस चौकी देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

