विनोद ठमके, विरुर्(स्टे) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील सर्वात मोठी म्हणून ओळखली जाणारी ग्रामपंचायत विरुर स्टेशन येथील निवडणूक थेट सरपंच पदासाठी जनतेतून होत आहे. विरूर हे गाव पेसा अंतर्गत असल्यामुळे येतील सरपंच हा आदिवासीच निवडावा लागतो. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आजी माझी सदस्याची साथ घेऊन उमेदवार म्हणून निवड केली.आपणच निवडून येणार हे स्वप्न उराशी बाळगून 8 उमेदवारांनी सरपंच पदासाठी अर्ज भरल्याने गावात उत्स्कुत्ता शिगेला पोहचली आहे. 58 उमेदवार सदस्य पदासाठी पात्र झालेले आहेत.
राजुरा तालुक्यातील लोकसंख्येत मोठी व आथिर्क दुष्ट्या मजबूत म्हणून पाहिल जाणारी ही ग्राम पंचायत विकासाच्या दुष्टिने मात्र शून्य आहे. गावाची वाढती लोकसंख्या पाहता विरूर ग्रामपंचायत आजही समस्याच्या विळख्यात गुंडाळलेली आहे. त्यामुळे या गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने सर्व सत्ताधारी पक्षात सत्तेसाठी रस्सीखेच स्थानिक विविध पक्षाचे नेते करीत आहे. स्थानिक पक्षाच्या नेतानी उमेदवाराची वेगळी फळी निर्माण करून बंड फुकारून बंडखोरीला सामोरी जात आहे. यामुळे सत्ता कोणाच्या हातात येणार या कडे गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. मागील कार्यकाळात सरपंच हा काँग्रेसचा होता. आणि बहुमत मात्र भाजपा ला, यात बहुमत काँग्रेस ला मिळविता आले नाही. म्हणून यावेळी सत्ता आपल्या हाती यावी यासाठी प्रत्येक पक्षांनी कंबर कसलेली आहे. यात काँग्रेस, शेतकरी संघटना, भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व भाजपा समर्पित जनशक्ती आघाडी, व काही अपक्ष संघटनांनी या रिंगणात कंबर कसलेली आहे. या रिंगणात कोणत्या पक्षाचा विजय होतो व सत्ता कोणाच्या हाती येणार आणि गावाचा विकास खरचं आता तरी होणार का ? असे विविध प्रश्न नागरिकात निर्माण होत आहे.