✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक ०५ डिसेंबर चे रात्री ८ वा. सुमारास फिर्यादी दुलारसिंग श्रीकपिल पासवान, रा. म्हाडा कोलोनी, हिंगणघाट हे झांसी राणी चौक, हिंगणघाट येथुन पायदळ फोनवर बोलत जात असतांना मोटरसायकल दोन अज्ञात इसम फिर्यादीचे मागुन येवून त्याचे हातातील मोबाईल जबरीने हिसकावून घेवून फसार झाले.
त्यामुळे दुलारसिंग श्रीकपिल पासवान यांनी स्थानिक हिंगणघाट पोलीस ठाण्यात येथून तक्रार दाखल केली. यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप.क्र. १२८०/२०२२ कलम ३९२, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेवून हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन आरोपी व चोरलेल्या मोबाईलबाबत शोध घेतला असता, सदर गुन्हयातील जबरीने हिसकावुन नेलेला मोबाईल हा निशानपुरा वार्ड, हिंगणघाट येथे राहणारे गौरव श्रीधर वाघमारे व विधि संघर्षित बालक दोन्ही रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट यांनी हिसकावून नेल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता, त्यांनी सदर जबरी चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यांचेकडुन एक विवो कंपनीचा ॲन्ड्राईड मोबाईल व गुन्हा करण्याकरीता वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एमएच- ३४/क्यु-४३५८ असा आरोपी व विधी संघर्षित बालक यांचे ताब्यातुन जप्त करून आरोपी गौरव वाघमारे यास
अटक करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला.
सदर गुन्हयातील आरोपी गौरव वाघमारे याची पोलीस कोठडी घेतली असता, त्यास जबरी चोरी
करीता वापरलेल्या वाहनाबाबत विचारपुस केली असता त्याने ते वाहन पो.स्टे. गिरड हद्दीतील कोरा गावातुन चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने त्याचे दोन विधी संघर्षित बालकासह जिल्हयातील व बाहेर जिल्हयातील विविध प्रकारच्या ७ मोटर सायकल व २ मोबाईल चोरल्याचे कबुली दिली. आरोपी गौरव वाघमारे याचेकडुन ७ मोटर सायकल, सदर गुन्हयात जबरीने चोरलेला एक मोबाईल व इतर दोन चोरलेले मोबाईल असा एकुण जुमला किमंत १,९३,०००/- रू. चा माल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पो.नि. कैलाश पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे निर्देशांप्रमाणे पोउपनि. सोमनाथ टापरे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर संतोष गिते व सायबर शाखेचे दिनेश बोथकर यांनी केली आहे.

