मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नायगाव:- सिन्नर तालुक्यातील सोनगिरी – नायगाव रस्त्यावर चालत्या मोटार सायकलर बिबट्याने हल्ला करून नऊ वर्षाच्या मुलीला जखमी केल्याची घटना काल दि.10 सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली आहे. वडिलांच्या प्रसंगवाधनाने मुलीचे प्राण वाचले. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.
सोनगिरी गावातील राजेंद्र लहाणे हे मुलगी गौरी लहाने वय ९ वर्ष ही गौरी सोबत मोटारसायकलवर नायगावहुन बाजार करून सोनगिरीकडे जात होते. कडवा पाटाजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने लहाणे यांच्या मोटारसायकलवर हल्ला चढवून पाठीमागे बसलेल्या गौरीवर हल्ला केला. मात्र बिबट्याचा अंदाज चुकून त्या मुलीचा पाय तोंडात सापडला. अशा परस्थितीत वडील लहाणे यांनी मोटारसायकल सुरूच ठेवल्यामुळे या झटापटीत काही अंतर पुढे गेल्यामुळे बिबट्याचा अंदाज चुकला. त्यामूळे गौरीच्या पायाला खोलवर जखम झाली आहे. मात्र वडील राजेंद्र लहाणे यांनी दाखवलेल्या धर्यामुळेच मुलगी बिबट्याच्या तावडीतून सुटल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. जखमी गौरीवर नाशिकच्या शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

