कवी :: गिरीष जाधव राह पुणे
माझी कविता,
रानातीलं मातीची’
बांधा बांधाने पसरलेल्या;
बाभळीच्या काटयाची !
माझी कविता जमिनीतं,
पिकलेल्या भूईमूगाच्या नात्याची ?
आणं शेतात औत दरणारया
बळीराजाची.
माझी कविता
मळया समोरच्या,
डोंगरात लपून बसलेल्या
पाऊल वाटांची.
माझी कविता
बैलांना घातलेल्या वैरणाची !
हांबरणारया गायीच्या शेणाची.
पान्हां पित असलेल्या वासराच्या
मूखातून जाणारया दूधाच्या धारेची.
माझी कविता
तिन दगडांच्या चूलिवरच्या
भाजरीच्या भाकरीच्या खरपूस
वासाची.
माझी कविता
शेणाच्या थापलेल्या गवरयांची
आणं शेतातून वेचून आणलेल्या
सरपणाची.
माझी कविता
लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या
माज्या बयच्या फाटलेल्या जूणेराची..
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

