Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्याच्या निषेधात पुण्यात निघाला भव्य मोर्चा! लक्षणीय नागरिकांनी उपस्थिती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 13, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्याच्या निषेधात पुण्यात निघाला भव्य मोर्चा! लक्षणीय नागरिकांनी उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️वैशाली गायकवाड, उपसंपादक पुणे

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे,दि.13:- महाराष्ट्र राज्यातील महान अशा महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, यांच्या विरोधात ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, आम्ही उतरलो रस्त्यावर शिवरायांसाठी’ असे फलक आणि भगवा, हिरवा, निळा असे सर्वच धर्मांचे झेंड हातात घेत सर्व पक्षिय व विविध संघटनांच्या वतीने बुधवारी शहरात भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोश्‍यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना तत्काळ पदावरून दूर करावे. तसेच भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, या मागणीसाठी सर्व पक्षियांच्या वतीने पुणे बंदची हाक देण्यात आली होती. बुधवारी सकाळी डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात लक्षणीय नागरिकांनी उपस्थिती लावून मोर्चा यशस्वी केला.

महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्याच्या निषेधात पुण्यात निघाला भव्य मोर्चा! लक्षणीय नागरिकांनी उपस्थिती.

हजारो महिला सहभागी…
पुण्यात काढण्यात आलेल्या या मोर्चात विविध राजकीय पक्षांबरोबर बावीसहून अधिक स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात तरुण, वृध्दा बरोबरच महिलांचा लक्षणीय सहभाग होता. यावेळी मोर्चात सामील झालेल्या आंदोलन कार्याच्या हातावर आणि डोक्यावर काळ्या पट्ट्या, हातात प्रत्येक धर्माचे झेंडे आणि मोर्चाच्या पुढील बाजूस छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा अशा शिस्तीमध्ये निघालेल्या मोर्चा लालमहाला पर्यंत आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

प्रत्येक चौकात महाराजांचे पुतळे..
पुण्यातून काढण्यात आलेल्या या मोर्चाच्या मार्गावर प्रत्येक चौकात शिवाजी महाराजांचे पुतळे ठेवण्यात आले होते. त्याला पुष्पहार घाऊन मोर्चा हळूहळू पुढे सरकत होता. तर मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांसाठी पाणी आणि चहाची व्यवस्था काही व्यापारी संस्थांच्या वतीने करण्यात आली होती. मुस्लिम, ख्रिश्‍चन, शिख यांच्यासह सर्वधर्मिय नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

सहभागी संघटनांची नावे.
पुणे शहर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), आम आदमी, पुणे शहर व्यापारी संघटना, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन, संभागी ब्रिगेड, मुलनिवासी मुस्लिम मंच, राष्ट्रसेवा समूह महाराष्ट्र, अखिल भारतीय बहुजनसेना, स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती, पदवीधर विद्यार्थी संघ, श्रीमंती घोरपडे सरकार प्रतिष्ठान, स्वराज्य भूमी प्रतिष्ठान, शिवनेरी रिक्षा संघटना, रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र, युवक क्रांती दल, शिवसंकल्प संस्था, जातीय लोकाधिकार संघटना महाराष्ट्र, पुणे शहर जिल्हा मातंग समाज, लहूजी समता परिषद, अद्वैत क्रीडा संघ, रिजनल ख्रिश्चन सोसायटी. मराठा टायगर फोर्स, राजश्री शाहू महाराज सोशल फाउंडेशन, मराठा सेवक समिती, रिपब्लिकन सेना, आजाझ समाज पार्टी, जमियते, उलमाए हिंद, दलित पँथर ऑफ इंडिया.

Previous Post

वर्धा दारूसाठी देवाला पण नाही सोडलं, महिलेने चक्क देवघरामध्ये लपवून ठेवला अवैध दारूचा साठा.

Next Post

मंत्री चंदकांत पाटील शाईफेक प्रकरणी मनोज गरबडे वरील कलम 307 मागे; पोलिसांचेही निलंबनही रद्द.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मंत्री चंदकांत पाटील शाईफेक प्रकरणी मनोज गरबडे वरील कलम 307 मागे; पोलिसांचेही निलंबनही रद्द.

मंत्री चंदकांत पाटील शाईफेक प्रकरणी मनोज गरबडे वरील कलम 307 मागे; पोलिसांचेही निलंबनही रद्द.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In