✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आज वर्धा जिल्ह्यामध्ये सरकारी कागदावर दारूबंदी असली तरी सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर दारूची अवैध रित्या खरेदी-विक्री होत आहे. पोलिसांन पासून वाचण्यासाठी दारू विक्रेते वेगवेगळी शक्कल लढवत व्यवसाय करत आहेत. वर्ध्याच्या सावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सालोड मध्ये तर एका महिलेने भलताच कारनामा केला आहे.
या महिलेने चक्क देवघराच्या कप्प्यात दारू ठेवून विक्री केली आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या महिलेकडे अनेकदा धाडी टाकल्या, पण घरात दारूसाठा मिळत नव्हता. यानंतर गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी पुन्हा धाड टाकली. महिलेने दारू विक्रीसाठी पोलिसांची नजर चुकवत चक्क देव्हाऱ्याखालीच बॉक्स तयार केला होता, यामध्ये देशी आणि विदेशी दारूच्या 49 शिष्या आढळून आल्या आहेत. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.