वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- महाराष्ट्र राज्याला पुरोगामी राज्य म्हणून संपूर्ण देशात ओळख आहे. इथल्या महापुरुषांनी आपल्या कार्याने संपूर्ण देशाला दिशा दाखवण्याचे महान असे कार्य केले आहे. पण सध्या राज्यात महापुरुषांवर विषारी व्यक्तव्यामुळे मोठ आंदोलन पेटल आहे. त्यात काही दिवसापूर्वी पुण्यातील चिंचवड येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या वर शाई फेकण्यात आली होती. शाई फेकणारा मनोज गरबडे याच्यावर कलम 307 अर्थात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सर्व स्थारावरून गृहमंत्राल यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली होती. यापार्श्वभूमीवर आता हे कलम मागे घेण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पोलिसांना दिले आहेत.
पोलिसांच्या निलंबनाचा आदेश रद्द.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्याची घटना घडल्या नंतर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पुण्यातील 11 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच मनोज गरबडे याच्यावर कलम 307 सदोष मनुष्यवधाचा गुन्हाचे कलम लावण्यात आलं होतं. याप्रकरणी आता खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलिसांवरील निलंबन मागे घेतलं असून आरोपीवरील कलम 307 मागे घेण्यात आलं आहे.