संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन काही सरपंच उपसरपंच यांचे प्रलंबित मानधन तांत्रिक अडचणी मुळे जमा झाले नाही. त्यामुळे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी पाठपुरावा करुण सरपंच उपसरपंच यांच्या मानधन बाबतीतील समस्या सोडवावी, तसेच १५ व्या वित्त आयोगाचा पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना मिळणारा १० टक्के निधी प्रत्येक गावाला पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फतच खर्च व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले. ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच समस्यांचे निराकरण करू असे आश्वासन दिले.
या प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंतदादा पाटील, विदर्भ अध्यक्ष अॅड देवा पाचभाई, विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कराडे, भद्रावती तालुका अध्यक्ष प्रदीप महाकुलकर, सरपंच धनराज पायघन, उपसर पंच मंगेश धाडसे, जगदीश चौधरी, संतोष तुराणकर यासह अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

