✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- एमआयडीसी आद्योगिक परिसरातील शासकीय दुग्ध व्यवसाय विभागातील प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे. एकेकाळी 16 हजार लिटर दुधावर प्रक्रिया केली जाणाऱ्या या दुग्धशाळेत सध्या कमालीची शांतता आहे. सर्व मशीन आणि वस्तू या धूळखात पडल्या आहेत. एखादी पडीक इमारत वाटावी अशी अवस्था या दुग्धशाळेची झाली आहे. त्यामुळे जील्हातिल दूध विभागावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
दुग्धशाळेची दयनीय परिस्थिती..
तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली बॉयलर मशीन दुरुस्त करण्याकरिता वेळ लागला तसेच दुधाचे शासकीय दर कमी असल्याने शेतकरी इकडे वळत नाहीत. परिणामी सर्व कार्यच ठप्प झाले आहे. गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेल्या, गोरसपाक साठी विदेशातही प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्याच्या दुग्धशाळेत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मागच्या सरकारमध्ये राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार हेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तरीदेखील शासकीय आणि प्रशासकीय उदासीन तेला ही दुग्धशाळा बळी पडली आहे. दुधाला मिळणाऱ्या कमी दरामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कल खासगी दूध केंद्राकडे वाढला आहे. शासकीय खरेदीपेक्षा तिकडे त्यांना चांगला दर मिळत असल्यानं शेतकररी खासगी दूध संघाकडे दुधाची विक्री करत आहेत. त्यामुळं वर्ध्याच्या दुग्धशाळेत सातत्यानं दुग्ध संकलनात घट होत गेली.
कमी दराचा शेतकऱ्यांना फटका
शासनाने दुधाच्या दरात वाढ केली नाही. त्यामुळे पशुपालकांना खासगी दूध डेरीचेच दर परवडणारे आहेत. त्यामुळं शासनाचा सहकार तत्वांवरील दुग्ध व्यवसाय मोडकळीस आला आहे. दुधाच्या 3.5 फॅटला 25 रुपये 30 पैसे इतकाच शासकीय दर आहे. तर खासगी डेअरीमध्ये दुधाचे दर 32 ते 35 रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळं गोपालक शेतकरी खासगी कंपन्यांकडे वळल्याचं चित्र दिसतंय.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
