✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई,17 डिसेंबर:- भाजप नेत्यांकडून महापुरूषांबद्दल करण्यात आलेली विधान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यासह विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीने महामोर्चाचे आयोजन केले आहे आणि या मोर्चाला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली आहे. भगवे, राष्ट्रवादी, काँग्रेसचे झेंडे घेऊन कार्यकर्ते हजर झाले आहे.
ठरल्याप्रमाणे सकाळी 11.30 वाजता हा मोर्चा मुंबईतील रिचर्डसन्स क्रुडास मिलपासून निघाला आहे. टाइम्स ऑफ इंडियापर्यंत हो मोर्चा पोहोचला. राज्यभरातून आणि मुंबईच्या काना कोपऱ्यातून लाखो कार्यकर्ते या मोर्चात सामील झाले होते. या मोर्चा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि घटकपक्ष, कम्युनिस्ट पक्ष सुद्धा सामील झाले आहे. लाखो कार्यकर्त्यांनी मुंबईचे रस्ते तुडुंब भरले आहे. संजय राऊत, सुप्रिया सुळे आंदोलनात सामील झाल्या आहेत.
या मोर्चात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मोर्चात सहभागी झाले आहेत. मविआच्या या मोर्चाला मुंबई पोलिसां कडून 13 अटींवर परवानगी देण्यात आली होती.
दरम्यान, महाविकास आघाडीचा महामोर्चा आज मुंबईत काढण्यात आला. मात्र आजच्या मोर्चाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण गैरहजर होते. मात्र यावरुन आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र अशोक चव्हाणांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट केलीये. मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील पूर्वनियोजित विवाहसोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणं शक्य नाही असं ट्विट करत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून हा मोर्चा काढून भाजप आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

