मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- उवविभागाअंतर्गत येत असलेल्या उप पोलीस स्टेशन राजाराम खां. येथील प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे राजाराम येथून कोल्हापूर परीक्षेत्रात बदली झाली असल्याने राजाराम खां. पोलीस स्टेशनच्या आवारात निरोप समारंभ कार्यक्रम मोठया थाटात संपन्न झाला आहे.
या दोन ही अधिकारी २०१७ साली राजाराम ठाण्यात पदभार स्वीकारल्या नंतर आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात विविध समाजपयोगी उपक्रम, खेळाचे स्पर्धा, शिबीरे, शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे वाटप कार्यक्रम, जयंत्या, सामाजिक उपक्रम, स्वछता उपक्रम, वृद्ध,दिव्यांगाना साहित्य वितरण, रस्ते दुरुस्त, तलाव बांधकाम असे विविध कार्य करून जिल्हा पातळीवर राजाराम खां. पोलीस स्टेशनचे नावलौकिक केले आहेत.
नवनियुक्त उपपोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अंमलदार वर्ग, एसआरपी एफ, एसआरपीएफ जवानांनी भोरे व कोल्हे या दोघां अधिकाऱ्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. या वेळी राजाराम परिसरातील पत्रकार टीमच्या वतीने ही शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार करून निरोप देण्यात आले आहे. या प्रसंगी मंचावर नवनियुक्त उपोनी चौधरी, याकूब खान, श्री. तयाडे, पोलीस पाटील सत्यम भंडारवार, सुधाकर आत्राम, संतोष श्रीरामवार, नामदेव पेंदाम, सूर्यकांत आत्राम, व्येकंटेश अलोणे, पत्रकार उमेश पेंड्याला, रमेश बामनकर, सुरेश मोतकुरवार, रोशन कंबगौनीवार, मधुकर गोंगले,तसेच जिल्हा पोलीस अंमलदार, एसआरपीएफ, एसआरपीएफ चे जवान व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यकामाचे सूत्रसंचालन नवाडे केले तर आभार प्रदर्शन पो. सिपाई संतोष करमे यांनी मानले.