ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- तालुक्यातील नेरी गावाच्या शेतकऱ्यांना प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून आज कॉंग्रेस कडुन प्रशासन जागो अनोख्या आंदोलन करून सर्वाचे लक्ष वेधल.
तालुक्यातील नेरी ते सार्वे गावाला जोडणारा रस्ता शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीचा रस्ता पाण्यात गेला असता तहसील कार्यालया समोर अडीचशे शेतकऱ्यांनी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण केले होते. यावेळी प्रशासनाने सबंधित फरशी साठी प्रस्ताव शासना कडे करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तब्बल तिन महिने उलटले तरी प्रशासनाने काहीच केले नाही म्हणून आज कॉंग्रेसने प्रशासन जागो आंदोलन करुन पुन्हा आठवण म्हणून निवेदन दिले.
पाचोरा तहसीलदार आवारात सकाळ पासून शेतकरी जमले होते. प्रशासनाने शेतकर्यांना न्याय देण्यासाठी जागो प्रशासनच्या घोषणांनी परिसर दणाणला यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अंबादास गिरी, विधानसभा उपाध्यक्ष प्रविण पाटील, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शरीफ शेख, शकंर सोनवणे, सुनील पाटील, विजय सुर्यवंशी, काशिनाथ अहिरे, नाना गढरी, इरफान पठाण, अनवर पठाण, सुरेश पाटील, किरण पाटील, दिलीप पाटील, याकुब पठाण शेनफडु पाटील, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. यापुढे प्रशासनाने गांभीर्या घेतले नाही तर सनदशीर मार्गाने वेगवेगळे आंदोलन करण्यात येणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348