मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- दिनांक 25 डिसेंबर रोज रविवारला सकाळी 9.00 वाजता. संघमित्रा बुद्ध विहार आलापल्ली भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अहेरी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आलापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने, बाल संस्कार शिबिरात मनुस्मृती दिन अर्थात स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला.
सुरवातीला जगाला शांतीचा संदेश देणारे विश्व वंदणिय तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमानां मेनबती, अगरबत्ती प्रज्वलीत करून वंदना घेण्यात आली. नंतर बाल उपासकांना मनुस्मृती तथा स्त्रीमुक्ती दिन याविषयी आयु. भीमराव झाडे यांनी सखोल माहिती दिली व आणापान शिकवण्यात आली. या नंतर सौ. देशभ्रतार यांनी मनुस्मृती दिन व इतरही माहीती दिली. या कार्यक्रमाला बहुसंख्य उपासक उपासिका उपस्थित होते. आयुनि लैजा करमे, आयु राजेश्वर दुर्गे, आयु रविंद्र बारसिंगे, आयु कार्तिक निमसरकार, आयु अमोल दूरयोधन, आयु दादाजी फुलझेले आदी बौद्ध उपासक, उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

