Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सार्वजनिक ठिकाणी बॅनरबाजी करणाऱ्या भाऊ, दादांना नाशिक महानगर पालिकेचा चाप, आता होणार कारवाई.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 6, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
सार्वजनिक ठिकाणी बॅनरबाजी करणाऱ्या  भाऊ, दादांना नाशिक महानगर पालिकेचा चाप, आता होणार कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- कुणाचाही वाढदिवस असला कि चौकात, गल्लीत, मोठ्या बेटावर बॅनर लावायची फॅशन मोठ्या प्रमाणात झाली आहे. बड्डे बॉयला शुभेच्छा देण्यासाठी मित्रमंडळी मोठ्या फेल्क्स मध्ये शुभेच्छा देतात. काहीवेळा तर स्वतः भाऊच पैसे खर्चून बॅनरबाजी करत असतो, मात्र गेल्या काही दिवसांपासून अशा भाऊ, दादांना चाप लावण्यात नाशिक महानगर पालिकेला यश आले आहे. असे बॅनर आढळून आल्यास थेट कारवाई करण्यात येत आहे.

नाशिक शहराला विद्रूप करणारे अनधिकृत होर्डिंग तसेच फलक काढण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे अनधिकृत होर्डिंगबाबत अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने कारवाईची मोहीम जोरात सुरू आहे, अनधिकृत होर्डिंग आढळल्यास थेट गुन्हा दाखल करण्यासह दंडात्मक कारवाई केली जात आहे. यासोबत होर्डिंग्जवर अधिकृत परवानगीसाठी क्यूआर कोड बंधनकारक केल्याने अनधिकृत होर्डिंग्जला चाप बसणार असल्याचा दावा विविध कर विभागाने केला आहे. आता पर्यंतच्या कारवाईत महापालिकेने 200 हून अधिक बेकायदा बॅनर हटवले आहे.

नाशिक महानगरपालिकेने बेकायदेशीर जाहिरात फलकांच्या विरोधात केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून, गेल्या तीन दिवसांत राजकीय पक्ष आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांशी संबंधित 200 हून अधिक बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर हटवले आहेत. बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर्सविरोधात विशेष मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. नाशिकरोड विभागातील दत्त मंदिर चौक, बिटको पॉइंट आणि जेलरोड परिसरात मनपा पथकांनी ही मोहीम राबवली आहे. नाशिक महापालिकेने आता शहरात 146 ठिकाणे निश्चित केली असून जिथे शुल्क भरून काही दिवसांसाठी तात्पुरते होर्डिंग्ज लावता येतील. मात्र, त्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालयांची परवानगी घेणे बंधनकारक असेल.

सध्या शहरात होर्डिंग्ज, बॅनर, शुभेच्छा फलक लावण्याचा सपाटा सुरू झाला आहे. यामुळे नाशिक शहराच्या शहर सौंदर्यीकरणावर परिणाम होत होता. अखेर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नवीन धोरण जाहीर केले. त्यानुसार शहरात मनपा व खासगी जागेत होर्डिंग्ज लावण्याबाबतची ठिकाणे, तसेच त्याचे भाडेही जाहीर केले आहे. शहरातील ठिकाणे निश्चित करण्यात आली त्या नुसार या ठिकाणांव्यतिरिक्त मोकळ्या जागेवर लावण्यात आलेले होर्डिंग बेकायदेशीर ठरवून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. यानुसार नाशिक महापालिकेने 200 हून अधिक बेकायदा बॅनर हटवले आहे.

होर्डिंग्जवर क्यूआर कोड हवा…
नाशिक महापालिकेने शहरातील अधिकृत होर्डिंग्जच्या जागा निश्चित केल्या असून, त्याची यादीही महापालिकेच्या संकेतस्थळावर www.nmc.gov.in प्रसिद्ध केली आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी होर्डिंग्ज लावायचे असेल तर संबंधित विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांत अधिकृत अर्ज दाखल करून संबंधित परवाना घ्यावा, तसेच होर्डिंग्जवर अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगी दिलेले ठिकाण या माहितीचा क्यूआर कोड बंधनकारक केला गेला आहे.

Previous Post

श्रीरामपुरातून साडेसहा लाख लाखाचा दरोडा, एक चूक भोवली त्यामुळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

मुकूटबन येथील बी. एस. इस्पात कोळसा खाण विषयक तक्रारीची राष्ट्रीय ओबीसी आयोगाव्दारे दखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुकूटबन येथील बी. एस. इस्पात कोळसा खाण विषयक तक्रारीची राष्ट्रीय ओबीसी आयोगाव्दारे दखल.

मुकूटबन येथील बी. एस. इस्पात कोळसा खाण विषयक तक्रारीची राष्ट्रीय ओबीसी आयोगाव्दारे दखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In