संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन साखरवाही:- दिनांक 03 जानेवारी रोज मंगळावर ला मौजा साखरवाही येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही, ग्रामपंचायत साखरवाही, महिला जीवन ज्योती ग्रामसंघ-उमेद साखरवाही यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच वर्षाताई बोरकुटे होते, कार्यक्रमाचे उदघाटन कौशल्याताई कातकर यांनी केले. कार्यक्रमाचे विशेष प्रमुख मार्गदर्शक सभापती कुंदाताई जेणेकर यांनी महिलांचे कर्तव्य व जागृती याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्पवाही उत्पादक व्यवस्थापक विशाल भोगावर यांनी समाजातील अनिष्ट चाली रीती त्यामुळे स्त्रियावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, स्त्रियांना होणाऱ्या अत्याचार व त्या साठी असणारे कायदे याबाबत अध्यक्षीय भाषणातून मनोगत सरपंच वर्षाताई बोरकुटे यांनी केले. विविध महिलांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, उत्कृष्ट स्पर्धकाना परतोषिक देऊन गौरवनीत करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्र्यावर जिल्हा प्राथमिक शाळा येथील विध्यार्थी यांनी व्रक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यात आले. रांगोळी स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या, सेंद्रिय शेती, शासकीय कृषी योजना याबाबत मार्गदर्शका कडून मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक रुपेश गेडेकर व आभारप्रदर्शन सरपंच कल्पनाताई कोल्हे यांनी केली आजच्या कार्यक्रमाप्रसंगी अंबुजा सिमेंट फॉउंडेशन उपरवाही प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जम्बूलवार, हेमराज साळवे, रजनी खानोरकर, अश्विनी जेणेकर, उपसरपंच भास्कर वनकर, उमेद अभियान पडवे मॅडम, साखरवाही जि प शाळा मुख्याधपक सोयाम, बोबडे सर, कृषी सहाय्य्क खिल्हारे सर, ईश्वर वानखेडे, जनार्धन जि बोबडे, गजानन विधाते, अमर वनकर, राहुल पडवेकर, पुंजाराम बर्डे, पुरुषोत्तम गंधारे, कविताताई आगलावे, दौलत बोरकुटे, भांडक सर इतर मान्यवर व बहुसंख्येने महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.

