पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर
पुणे :- लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु र नं ११ / २०२३ भादवि कलम ३९२.३४ मधील महीला फिर्यादी यांचा दि. ०७/०१/२०२३ रोजी मौजे तरडे (वरचे तरडे) गावचे हद्दीत त्यांचे शेतातील रहाते घरी दोन अज्ञात चोरटे मोटारसायकल वर येवुन ट्रक्टर एक्सचेंज, खरेदी-विक्री चा बहाणा करुन महीला फिर्यादी घरी एकटे असल्याचा फायदा घेवुन त्यांना बोलण्यामध्ये गुंतवुन त्यांचा मोबाईल फोन हिसकावून नेल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यातील अज्ञात चोरट्यांचा शोध घेवून त्यांचा अटक करणेबाबत मा. दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पो स्टे पुणे शहर यांनी आदेशीत केले होते… मा. वपोनि यांचे आदेशाने तपास पथकातील पोउपनि अमित गोरे व स्टाफ अज्ञात मोबाईल चोरांचा शोध घेत
असता तपास पथकातील बाजीराव वीर व पोशि दिपक सोनवणे यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, “तरडे गावामध्ये महिलेकडुन मोबाईल हिसकावणारा इसमा हा आंबेडकर नगर, नायगाव या ठिकाणी उभा आहे त्याचे अंगावर निळा रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट आहे.” वगैरे माहीती मिळाल्याने त्यांनी सदर बाबत पोउपनि गोरे यांना कळवीले असता पोउपनि गोरे यांनी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण सो यांना सदर बाबत माहीती कळविली. वपोनि चव्हाण सो यांनी त्या चोरट्यास सापळा रचुन पकडन्यायावत मार्गदर्शनपर सुचन्या दिल्याने पोउपनि गोर व तपास पथकातील स्टाफ असे सदर ठिकाणी गेले असता आंबेडकर नगर, नायगाव येथे बातमीदाराने सांगीतलेल्या वर्णनाचा इसम थांबला होता. पोउपनि गारे व स्टाफ असे त्याचे जवळ गेले असता त्यास संशय आल्याने तो इसम तेथून पळु लागला, त्यावेळी तपास पथकातील स्टाफने त्यांचा पाठलाग करुन नमुद इसमास शिताफीने ताब्यात घेतले व लोणीकाळभोर पोलीस स्टेशन तपास पथक या ठिकाणी आनुन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव (१) राजु बाळु शेंडगे वय ३९ वर्षे धंदा शेती रा. मु. पो तरवडी, रानमळा, शेंडगे वस्ती, ता. हवेली जि असे सांगुन त्याचेकडे दाखल गुन्ह्याच्या अनुशंगाने तपास केला असता त्यांने सांगीतले की, ” तो व त्याचा मित्र नामे अबक यांनी मिळून सदरच जबरी चोरी केली आहे. ” वगैरे सांगुन गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोउपनि अमित गोरे हे करत आहेत. वरील प्रमाणे मोटारसायकल वर येवुन ट्रक्टर एक्सचेंज, खरेदी-विक्री चा बहाणा करुन जर कोणाचा मोबाईल किंवा इतर ऐवज चोरट्यानी अशा प्रकारे हिसकावला असेल, तर लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्याचे आवाहन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांनी केले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री.संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. मा.रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री विक्रांत देशमुख पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५, मा. बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोउपनि अमित गोरे पोहवा गायकवाड, पोहवा पाटोळे, पो हवा बोरावके, पोना नागलोत, पोना जाधव, पोना देवीकर, पोशि पुंडे, पोशि वीर, पोशि कुदळे, पोशि पवार, पोशि सोनवणे यांच्या पथकाने केली आहे..