संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा दि. 17 जानेवारी:- ला अंबुजा सिमेंट फाऊंडेशन (उत्तम कापुस ) उप्परवाही INMH119 मधील PU मॅनेजर पायल चोप्पावार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोली (बु) येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन ऊपरवाही व भाग्यलक्ष्मी ग्राम संघ चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी मेळावा घेण्यात आला. व महिलांच्या समस्या शेती व्यवसाय बद्दल समस्या जाणून घेऊन त्यांना खालील विषयावर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रमोद मेश्राम (प्रकल्प सन्वयक) उद्दघाटक पिलाजी पाटील भोंगळे (सरपंच ग्रा. प. चिंचोली) आणि विशेष मार्गदर्शक म्हणून सुभाष बोबडे (साहाय्यक प्रकल्प समन्वक)
प्रमुख मार्ग दर्शक म्हणुन जय प्रकाश निर्मल (ठाणेदार पोलीस विरुर स्टे. चेतन चव्हाण (ता. कृ. अ.) विशाल भोगावार (लोकेशन इन्चार्ज उपर् वाही) राठोड सर (maneger C.D.C.C.bank virur) प्रमुख पाहुणे म्हणून सौ. पुष्पांजली धनवलकर (उपसरपंच) संतोष न्याहरे (पो. पा.) शंकर धनवलकर (तंटा मुक्ती अध्यक्ष) गोपाल डाहुले(शा. व्य. स.) आणि सर्व ग्रा.प.सदस्य व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांनी महिलांना खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले. महिलांनी बचत गटा मार्फत उत्पादक वस्तूची विक्री करण्यासाठी विपणन कौशल्य प्रशिक्षण घेणे. गावाच्या विकासात महिला काय काय योगदान देऊ शकतात. कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान. महिला बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग स्थापन करणे. शेतकरी महिला गटाद्वारे कापूस खरेदी विक्री विषयी माहिती. ACF – BC अंतर्गत चालणाऱ्या कामाची माहिती. जैविक कीटकनाषके तयार व त्यांच्या वापराविषयी माहिती.
वातावरण बदलणात कारणीभूत असलेले घटक व त्यामुळे होणारे नुकसान.कापूस वेचनी, साठवण व तंतुची काळजी. वातावणातील बदल व त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम. EM.1 Solution विषयी माहिती देऊन त्याचे फायदे व कार्य विषयी माहिती. Low Cost Drip Irrigation च्या वापराचे फायदे. शेती पूरक उद्योगांची उभारणी करणे. कापसाचे धसकटे काढल्यांनतर ते न जाळता त्याचे कम्पोस्टिंग करणे. या कार्यक्रमा दरम्यान विविध स्पर्धा घेण्यात आले व प्रोत्साहन म्हणून बक्षीस देण्यात आले. वरील सर्व गोष्टीची माहिती देण्यात आली.

