नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन धाराशिव/मुंबई:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे आरोग्य मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 ते 25 जानेवारी 2023 दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी “भव्य चित्रकला स्पर्धेचे” आयोजन करण्यात येणार आहे तरी या संदर्भात नियोजन व चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंत्री सावंत यांनी याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना धाराशिव जिल्हा,
जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख,
धाराशिव युवासेना जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.