नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी. 9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी मुंबई:- सीआयडी अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणून भासवत नवी मुंबईत दोघा भामट्यानी दोन जणांची तब्बल २० लाख रुपयांना फसवणूक केल्या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या भोंदूबाबाने आपल्याकडे एक धातू असून या धातूवर तांदूळ टाकताच तांदूळ उभा होतो तसेच यात दुर्मिळ शक्ती असल्याचा दावा केला होता. या धातूचा वापर नासा तसेच प्रयोग शाळेत होत असून त्यासाठी विविध संस्था देखील काम करत आहेत, असे भासवून करोडो रुपयांच्या नफ्याचे अमिश आरोपीनी दाखवले होते.
या भोंदूबाबाच्या काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेऊन २०१२ ते २०१७ दरम्यान पीडित अशोक गडदे आणि कल्पना साळुंखे पैसे देत राहिले. यात अशोक यांनी १२ लाख तर साळुंके यांनी ७ लाख रुपयांची रक्कम दिली आहे. मात्र नफ्या संदर्भात विचारणा केली असता आरोपी उडवा उडावीची उत्तरे देऊ लागले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने दोन्हीही पीडित व्यक्तींनी खांदेश्वर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी खान्देश्वर पोलिसांनी २० लाखांच्या राईस पुलिंग मेटल घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी रवी भोईर आणि वृषभ म्हात्रे यांचा शोध घेत आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी दिली.