नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मुंबईकरांनो ट्रेन ने प्रसाव करत असाल तर सावधान लोकल ट्रेनचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे मुंबईची जीवन दायनी लोकल ट्रेन चाक काही दिवसा साठी थांबणार आहे. मध्य रेल्वेवर २ दिवस तर हार्बर मार्गावर ३ दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे. २९ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत ३ दिवस रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबई – पश्चिम रेल्वे सहा गर्डर्स डी-लाँच करण्यासाठी अंधेरी येथे २९ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत ३ दिवस रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच मध्य रेल्वेवर २८ व २९ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री २.०५ ते ४.०५ या वेळेत खडवली आणि आसनगाव दरम्यान अप आणि डाउन मार्गांवर ब्लॉक घेतला जाणार आहेत.
हार्बर मार्गावरील सेवा रद्द – पश्चिम रेल्वे सहा गर्डर्स डी-लाँच करण्यासाठी अंधेरी येथे २९ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत ३ दिवस रात्रकालीन २२.०० ते ०५.०० वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत वांद्रे येथून २२.०३ वाजेपासून ते ००.१५ वाजेपर्यंत गोरेगावच्या दिशेने सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गा वरील उपनगरीय सेवा रद्द राहतील. गोरेगाव येथून २१.४३ ते ००.०७ या वेळेत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा रद्द राहतील.
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक – मध्य रेल्वेवर २८ व २९ जानेवारी रोजी मध्यरात्री २.०५ ते ४.०५ या वेळेत खडवली आणि आसनगाव दरम्यान अप आणि डाउन मार्गांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग मधील बदलासंदर्भात रात्रीचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१५ वाजता कसारा करीता सुटणारी लोकल ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. कसारा येथून ०३.१५ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी लोकल ठाणे येथून चालविण्यात येईल.
लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने – खालील गाड्या आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा येथे ३५ मिनिटे ते ९५ मिनिटांपर्यंत नियमित केल्या जातील आणि वेळेपेक्षा उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
ट्रेन क्रमांक 12152 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 11402 आदिलाबाद – मुंबई एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल नागपूर मार्गे, ट्रेन क्रमांक 18030 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 20104 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस