Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दोन नराधमांनी केलं पडीक इमारतीत अस घाणेरडं कृत्य की, संपूर्ण पनवेल हादळल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 31, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
दोन नराधमांनी केलं पडीक इमारतीत अस घाणेरडं कृत्य की, संपूर्ण पनवेल हादळल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पनवेल:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास खोपोली इथून कामावरुन पनवेल इथे आलेल्या तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. रिक्षातून लिफ्ट देतो, असं सांगत आरोपींनी तिला एका पडीक इमारतीत नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे रोजंदारी करणारे मजूर आहेत.

पनवेल शहर पोलीस स्टेशनने दिलेल्या माहिती नुसार, पिढीत तरुणी ही पनवेल येथील राहणारी असून ती खोपोली इथल्या एका लेडीज बारमध्ये काम करते. शनिवारी रात्री उशिरा ही तरुणी तिची शिफ्ट संपवून कामावरुन घरी जात होती. यानंतर ती पनवेलच्या मुख्य रस्त्यावरील ओरियन मॉल जवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली. जेवण आटोपेपर्यंत मध्यरात्र झाली. त्यानंतर ती घरी जाण्यासाठी मॉलजवळच ऑटोरिक्षाची वाट पाहत थांबली. यावेळी, आरोपी तरुणीजवळ आले. उशीर झाला आहे आणि रस्त्यावर एकटीनं थांबणं सुरक्षित नाही. त्यांनी तिला घरी सोडतो असं सांगितलं. तसेच, आम्ही काही अंतरावर ऑटोरिक्षा पार्क केली असल्याचं त्यांनी तरुणीला सांगितलं.

घरी जाण्यासाठी दुसरी रिक्षा न मिळाल्याने ही तरुणी त्यांच्यासोबत गेली. ते मुख्य रस्त्यापासून थोडं अंतर चालत गेल्यावर मॉलच्या मागे एका निर्जन भागात असताना त्यांनी तिला धमकावलं. त्यांनी तिला बळजबरीने रस्त्यापासून दूर नेलं. रेल्वे रुळ ओलांडून स्टेशनपासून थोडं दूर असलेल्या एका पडक्या इमारतीत नेलं. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या डोक्यावर वार करुन जखमी केलं. महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी तिला तिथेच सोडून पळ काढला, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादम यांनी सांगितलं.यानंतर तरुणीने पनवेल पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन दोघांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना पनवेल स्थानकाजवळील झोपडपट्टीतून अटक केली. बलात्कार पीडित तरुणीची तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अविनाश चव्हाण आणि सूरज देवडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपींवर सामूहिक बलात्कार, अपहरण आणि दुखापत करण्याच्या हेतूने मारहाण या आयपीसीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मुंबईत वीज चोरीची एक हजार प्रकरणे उघड, चार कोटी ५७ लाख रुपयांची विजेची चोरी.

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला पोलिसांनी केलं जेरबंद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला पोलिसांनी केलं जेरबंद.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला पोलिसांनी केलं जेरबंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In