विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देहर:- येथे सोमवारला एक अपघाताची घटना समोर आली आहे. 8:30 वाजताच्या दरम्यान एक कंटेनर रोडच्या किनाऱ्या वरून पलटी झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना नगर मनमाड रोड देहरे गावच्या जवळ एक ते दीड किलो मिटर आंतरावर 8.30 वाजताच्या सुमारास घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, या रोडचे काम मागील अनेक दिवसापासून सुरू आहे ते अजून पर्यंत पूर्ण पने झाले नसून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवास करत असताना त्रास होत आहे. या रोडच्या अपूर्ण कामामुळे या रोडवरव मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. प्रशासनाने वेळेत लक्ष देऊन या रोड चे काम लवकर पूर्ण करून द्यावं आशी मागणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशी वर्गा कडून होत आहे.

