सौ.हनिशा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर मो.9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- रा.काँ.पार्टी सेवादल विभाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत सेवादल विभागात अनेकांचा पक्ष प्रवेश करून नियुक्त्या देण्यात आले. यावेळी सेवादल मुख्य जिल्हा संघटक पदी खेमचंद इंदुरकर, जिल्हा उपाध्यक्ष पदी मनोज बेसरकरस,जिल्हा सचिव पदी तेजराम नेतनकर,गडचिरोली तालुका अध्यक्ष पदी सुनिल कात्रोजवार,तालुका उपाध्यक्ष पदी योगराज रामटेके, गडचिरोली शहर अध्यक्ष पदी मलय्या कालवा, शहर उपाध्यक्ष पदी नामदेव काटवले, महिला जिल्हा मुख्य संघटीका नैनाताई ढोलने यांची नियुक्ती सेवादल जिल्हाध्यक्ष अमर खंडारे यांनी नियुक्ती केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा उपाध्यक्ष फहिमभाई काजी,जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, सा.न्याय विभाग जिल्हाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, महिला जिल्हा अध्यक्ष प्रमिलाताई रामटेके, नईमभाई शेख,शहर कार्याअध्यक्ष कपिल बागडे, ओबीसी जिल्हा कार्याअध्यक्ष संजय शिंगाडे,युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार,युवक शहर अध्यक्ष अमोल कूळमेथे तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

